Pages

Tuesday 12 February 2019

अविश्वसनीय शौर्यगाथेची पहिली झलक पाहिलीत का?

२१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर केसरी आधारलेला आहे


You Can Download Latest Marathi Ringtones Here for Free


३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या २१ सैनिकांची अविश्वसनीय अशी शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पड्यावर पहायला मिळाणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक अक्षयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

सारागढीच्या युद्धातील एक छोटसं दृश्य अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण तत्पुर्वी अक्षयनं त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची पहिली वहिली झलक दाखवली आहे.
‘यावेळी माझ्या मनात प्रचंड अभिमानाशिवाय इतर कोणतीच भावना नाही. या वर्षाची सुरुवाक मी ‘केसरी’ने करतोय. आतापर्यंतच्या माझ्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे’, असं लिहित महिन्याभरापूर्वी अक्षयनं केसरीचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता. अक्षय सोबत या चित्रपटात परीणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.

0 comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.